What Are New ATM Rules In India 2026

 ‘या‘ बँकेने केले मोठे बदल!1 एप्रिलपासून ATM मधून पैसे काढण्याचे नियम बदलणार.What Are New ATM Rules In India 2026

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

What Are New ATM Rules In India 2026 जर तुम्ही बँकिंगच्या कामांसाठी आणि रोख रक्कम काढण्यासाठी एटीएम वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. आजकाल जवळपास प्रत्येक जण एटीएमचा वापर करतो कारण ते सोयीचं, जलद आणि सहज उपलब्ध आहे. पण अनेक वेळा आपण एटीएम वापरताना त्यामागचे नियम, मर्यादा आणि charges याकडे फारसं लक्ष देत नाही.

सध्या एटीएम संबंधित काही महत्त्वाचे नियम बदलले जात आहेत किंवा अपडेट होत आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खात्यावर आणि खिशावर होऊ शकतो. उदाहरणार्थ, तुम्ही महिन्यात किती वेळा free transaction करू शकता, त्यानंतर किती charges लागतात, किंवा एका दिवसात किती रक्कम काढता येते या सगळ्या गोष्टी आता अधिक स्पष्टपणे समजून घेणं गरजेचं आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लीक करा

अनेक वेळा असं होतं की आपल्याला माहिती नसल्यामुळे आपण limit पेक्षा जास्त transaction करतो आणि नंतर account मधून charges कापले जातात. काही लोकांना तर हे charges का लागले हे सुद्धा समजत नाही. त्यामुळे थोडीशी माहिती आणि जागरूकता तुम्हाला अनावश्यक खर्चापासून वाचवू शकते.

गॅस भाववाढी नंतर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म नि वाढवल्या किमती

याशिवाय, एटीएम वापरताना सुरक्षिततेचाही विचार करणे तितकंच महत्त्वाचं आहे. चुकीच्या पद्धतीने वापर केल्यास fraud चा धोका सुद्धा वाढू शकतो.

म्हणूनच, एटीएमचे नवीन नियम आणि त्यामधील बदल समजून घेणं प्रत्येक बँक ग्राहकासाठी खूप आवश्यक आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे पैसे सुरक्षित ठेवू शकता आणि अनावश्यक charges टाळू शकता.

What Are New ATM Rules In India 2026

नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीसह, १ एप्रिल २०२६ पासून बँकिंग क्षेत्रात मोठे बदल होणार आहेत. एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) आणि बंधन बँक यांसारख्या प्रमुख बँकांनी त्यांच्या एटीएम धोरणांमध्ये आणि व्यवहार शुल्कामध्ये सुधारणा केली आहे. या बदलांचा थेट परिणाम तुमच्या वॉलेटवर आणि दैनंदिन मर्यादेवर होईल. चला जाणून घेऊया की तुमच्या बँकेने नियमांमध्ये कोणते बदल केले आहेत.What Are New ATM Rules In India 2026

पंजाब नॅशनल बँक

पंजाब नॅशनल बँकेने आपल्या डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाचा बदल केला आहे. आधी अनेक कार्डांवर दिवसाला एक लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढण्याची परवानगी होती, पण आता ही मर्यादा कमी करून पन्नास हजार रुपये करण्यात आली आहे. तसेच प्रीमियम कार्ड वापरणाऱ्यांसाठीही मर्यादा दीड लाखावरून पंच्याहत्तर हजार रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. याचा अर्थ असा की, जर तुम्हाला मोठी रक्कम काढायची असेल तर तुम्हाला एकाच दिवशी पूर्ण रक्कम मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला दोन किंवा अधिक वेळा ATM ला जावं लागू शकतं, ज्यामुळे वेळ आणि मेहनत दोन्ही वाढू शकतात.What Are New ATM Rules In India 2026

हि बँक देत आहे सगळ्यात स्वस्त कर्ज

एचडीएफसी बँक

एचडीएफसी बँकेने ATM वापराशी संबंधित एक महत्त्वाचा बदल केला आहे जो अनेक ग्राहकांना माहिती नसतो. आता जर तुम्ही UPI च्या मदतीने ATM मधून पैसे काढले, तर तो व्यवहार तुमच्या मोफत ATM transaction मर्यादेत मोजला जाईल. पूर्वी UPI द्वारे काढलेली रक्कम वेगळी मानली जात होती, त्यामुळे अनेकांना त्याचा फायदा मिळत होता. पण आता जर तुम्ही ठरलेल्या free transaction पेक्षा जास्त वेळा पैसे काढले, तर प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क भरावं लागेल. त्यामुळे UPI वापरताना सुद्धा आता काळजी घेणं आणि transaction count लक्षात ठेवणं गरजेचं आहे.What Are New ATM Rules In India 2026

बंधन बँक

बंधन बँकेनेही ATM वापराचे नियम अधिक स्पष्ट आणि थोडे कडक केले आहेत. आता तुम्हाला तुमच्या स्वतःच्या बँकेच्या ATM वर महिन्याला पाच मोफत आर्थिक व्यवहार मिळतील. जर तुम्ही इतर बँकांच्या ATM चा वापर करत असाल, तर मेट्रो शहरांमध्ये फक्त तीन आणि नॉन मेट्रो शहरांमध्ये पाच मोफत व्यवहार करता येतील. यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारावर तेवीस रुपये आणि गैर आर्थिक व्यवहारावर दहा रुपये शुल्क आकारले जाईल. याशिवाय, जर तुमच्या खात्यात पुरेशी शिल्लक नसल्यामुळे transaction fail झाला, तरीही पंचवीस रुपयांचा charge लागू होईल. त्यामुळे ATM वापरताना balance check करूनच व्यवहार करणं खूप महत्त्वाचं ठरतं.What Are New ATM Rules In India 2026

हे नियम कोणत्या शहरांना लागू होतील?

मेट्रो शहरांमध्ये बंगळूर, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता, मुंबई आणि नवी दिल्ली यांचा समावेश आहे. इतर सर्व शहरे नॉन-मेट्रो श्रेणीत येतात.

What Are New ATM Rules In India 2026

Leave a Comment