Mpox किंवा monkey Pox ह्या आजाराचा वाढतोय भारतामध्ये धोका काय आहे हा आजार आणि याची लक्षणे जाणून घ्या सविस्तर What Is This Mpox Or Monkey Pox disease 2024
या आजाराने संपूर्ण जगभरातील 115 पेक्षा अधिक देशांमध्ये याचा प्रादुर्भाव वाढताना दिसतो आहे. 14 ऑगस्ट 2024 रोजी wHO नी या आजाराला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. 2022 मध्ये सुरू झालेल्या या आजारा सध्या भारतामध्ये धोका कमी असला तरी ह्या आजारापासून कसे बचाव करता येईल किंवा या आजार होऊ नये यासाठी काय दक्षता घ्यायची आहे हे आपण सविस्तर जाणून घेऊया.
Mpox किंवा monkey Pox म्हणजे काय ?
What Is This Mpox Or Monkey Pox disease 2024 मंकी बॉक्स हा एक जुनोसिस असून एक आजार आहे जो प्राण्यांपासून मनुष्य मध्ये पसरतो. या आजाराचे संक्रमण भारतामध्ये रोखण्यासाठी भारत सरकारने काही विमानतळे आणि लँड पोर्टवर दक्षता वाढवले गेले आहे. वायरस चा लवकरात लवकर शोध लागला म्हणून अनेक प्रयोगशाळा सुद्धा तयार आहेत.
विशेषता पाकिस्तान आणि बांगलादेशच्या जवळील सीमेवरच्या जागेवर अतिदक्षता बाळगण्याचे संकेत दिले गेले आहे.
What Is This Mpox Or Monkey Pox disease 2024 डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, विषाणू वाहून नेणाऱ्या प्राण्यांचे वास्तव्य असलेल्या उष्णकटिबंधीय वर्षावनांच्या जवळ प्रकरणे आढळतात. मंकीपॉक्स विषाणूचा संसर्ग गिलहरी, गॅम्बियन शिकार केलेले उंदीर, डॉर्मिस आणि माकडांच्या काही प्रजातींमध्ये आढळून आला आहे.
तथापि, विषाणूचा मानव-ते-मानवी प्रसार मर्यादित आहे. हे शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कातून, त्वचेवरील जखमांमुळे, श्वसनमार्गाद्वारे किंवा डोळे, नाक किंवा तोंडाद्वारे किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे, जसे की बेडिंग आणि कपडे यांच्या संपर्कातून असू शकते.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन किंवा सीडीसीच्या मते, संसर्ग पहिल्यांदा 1958 मध्ये शोधला गेला. संशोधनासाठी ठेवलेल्या माकडांच्या वसाहतींमध्ये पॉक्स सारख्या रोगाचे दोन उद्रेक नोंदवले गेले – ज्यामुळे ‘मंकीपॉक्स’ हे नाव पडले.
mpox ची लक्षणे-
हा आजार प्रामुख्याने संक्रमित व्यक्तींच्या संक्रमणात आल्यावर होऊ शकतो लैंगिक संपर्काद्वारे स्पर्श चुंबन याद्वारे सुद्धा हा आजार होण्याची शक्यता आहे
शरीरावर एक सपाट पुरळ दिसू लागतो आणि त्या पुरवळ्याला खाज सुटते ते खाज खाजल्यानंतर ते पुरे फुटले की त्यात होतो
ताप डोकेदुखी
स्नायूंचे दुखणे
थकवा जाणवणे
तर ही लक्षणे तुम्हाला जाणवत असल्यास तुम्ही तात्काळ या आजारावर टेस्ट करून घेणे गरजेचे आहे
तर आजच्या लेखात आपण एमपॉक्स किंवा मंकी बॉक्स ह्या आजाराविषयी माहिती मिळवली ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास जवळच्या व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा आणि अशाच नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या वेबसाईटला असत्यात भेट देत रहा.